Home अहमदनगर अहमदनगर: डम्पर मालकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली, तिघांवर गुन्हा  

अहमदनगर: डम्पर मालकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली, तिघांवर गुन्हा  

Ahmednagar Crime:  चितळे रस्त्यावर एका डम्पर चालकाने शिवीगाळ करत पोलिसदादांच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना.

The dumper owner filed a crime against the three in the ear of the police

अहमदनगर: शहरातील चितळे रस्त्यावर एका डम्पर चालकाने शिवीगाळ करत पोलिसदादांच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १२) घडली. पोलिस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार बाळासाहेब वेठेकर असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तिघा जणांवर मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

डम्पर मालक अरुण भानुदास ढोकणे (४२, रा. गणेशनगर, कल्याण रोड), चालक गणेश शेषराव नागरे (२१, रा. गाडगीळ पटांगण, नालेगाव) यासह डम्पर मालकाचा मुलगा, अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली अशी की, स्थानिक गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर व बबन विठ्ठल मखरे हे दोघे गुरुवारी चितळे रस्त्यावर गस्त घालत असताना ते चितळे रोड पोलीस चौकीसमोर मोटारसायकल उभी करून थांबलेले असताना याचवेळी तिथे मुरुमाने भरलेला डम्पर आला. हा डम्पर पाठीमागे घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल मखरे यांना धडक बसली. आणि ते खाली पडले. त्यानंतर चालकाने डम्पर बाधकाम सुरु असलेल्या ठिकाणी नेले. त्यावेळी वेठेकर हे डम्पर चालकाला समजावून सांगत असताना त्याने वेठेकर यांना शिवागाळ केली. त्यानंतर काही वेळातच तिथे डम्पर मालक ढाकणे हा आला मालकाने काही एक विचारपूस न करता त्याने वेठेकर यांना शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. वेठेकर हे मालकास समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना काही एक ऐकून न घेता कॉन्स्टेबल वेठेकर यांच्या कानशिलात लगावली. मारहाण झाल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आले. एका ज्येष्ठ पोलिस कर्मचान्याला मारहाण झाल्याने डम्पर मालकासह चालकांचा चांगलाच समाचार घेतला. रात्री उशिराने पोलिसाला मारहाण डम्पर मालकासह चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The dumper owner filed a crime against the three in the ear of the police

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here