Home पुणे धक्कादायक! डोक्यात हातोडी घालून एकाची हत्या

धक्कादायक! डोक्यात हातोडी घालून एकाची हत्या

Breaking News | Pune Crime:  36 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने मारून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना.

Killed one with a hammer on the head

पुणे: एका 36 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने मारून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.

राहूल सुदाम गाडेकर (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश रामनाथ कदम (वय 40, रा. चिंबळी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा राहूल हे शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कुरुळी गावातील बर्गेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या डोक्यात हातोडी आणि इतर हत्यार मारून खून केला आहे. तसेच पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Killed one with a hammer on the head

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here