Home जळगाव बैलगाडीत बसलेल्या महिलेसोबत घडलं विपरीत, धक्कादायक घटना

बैलगाडीत बसलेल्या महिलेसोबत घडलं विपरीत, धक्कादायक घटना

Breaking News | Jalgaon: धक्कादायक घटना, शेतमजूर महिलेच्या अंगावरील शाल चाकात अडकल्याने ती ओढली जाऊन गळ्याभोवती फास.

opposite happened with the woman sitting in the bullock cart

जळगाव: जळगाव तालुक्यातील भादली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  बैलगाडीत बसलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावरील शाल चाकात अडकल्याने ती ओढली जाऊन गळ्याभोवती फास बसला. यात जखमी होऊन महिलेचा मृत्यू (death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जानुबाई भायला बारेला (वय ३२) असं मयत महिलेचं नाव असून याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जानुबाई भायला बारेला ही मध्य प्रदेशातील गोंट्या पांचाळ येथील मूळ रहिवाशी असून ती कामासाठी भादली (ता. जळगाव) येथे वास्तव्यास होती. मोल मजुरी करून त्या व त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह सुरु होता. दरम्यान २४ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास भादलीच्या शेतशिवारात बैलगाडीने परिवारासह कामाला जात होते. त्यांच्या अंगावरील शालीचा काही भाग बैलगाडीच्या चाकात आला. बैलगाडीच्या वेगाने त्यांच्या मानेला जोरात गळफास बसल्याने महिला जबर जखमी झाली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांना पाणी पाजले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

नशिराबाद पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर घटनेची माहिती घेत पंचनामा केला. महिलेच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला दीर शांतीराम बारेला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: opposite happened with the woman sitting in the bullock cart

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here