Home अहमदनगर माहिती न देणाऱ्या त्या दोन ग्रामसेवकांना १५ हजारांचा दंड

माहिती न देणाऱ्या त्या दोन ग्रामसेवकांना १५ हजारांचा दंड

Kopargaon A fine of Rs 15,000 was imposed on the two Gram Sevaks 

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालूक्यातील दोन ग्रामसेवकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागून न दिल्याने दंड ठोठाविण्यात आला आहे.

नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के.एल. बिष्णोई यांनी ही कारवाई केली आहे.  यामध्ये ग्रामसेवक बी.एस. आंबरे यांना ५ हजार तर सुभाष नवसू पवार यांना दहा हजार दंड ठोठाविण्यात आला असल्याची माहिती अॅड. योगेश खालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील ग्रामपंचायतीत पाणी वितरण करणारा वाल्मिक महाळ नोर याचा १९९० ते २०१७ या कालावधीत पगार कोणामार्फत दिला जातो. यासंदर्भात माहिती मिळावी यासाठी महिला जनाबाई शिंदे यांनी १० एप्रिल २०१ ला माहिती अधिकारात माहिती मागविली होती. त्यावेळेस ग्रामसेवक सुभाष पवार यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर बी. एस. आंबरे यांची ग्रामसेवक पदी नेमणूक झाली त्यांनीदेखील माहिती न दिल्याने जनाबाई शिंदे यांनी ग्रामसेवकावर कारवाई व्हावी असे अपील दाखल केले होते.

नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के.एल. बिष्णोई यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ग्रामसेवकाचा खुलासा अमान्य करत त्यांना दंड केला आहे. सदर रक्कम पगारातून कपात करावी असा आदेश कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी केला आहे.

Web Title: Kopargaon A fine of Rs 15,000 was imposed on the two Gram Sevaks 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here