Home अहमदनगर कोव्हीड १९ नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

कोव्हीड १९ नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

Ahmednagar Violation of Covid 19 rules now carries a fine of Rs 500

AHMEDNAGAR: सार्वजनिक ठिकाणी व धार्मिक स्थळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड ठोठाविण्याची आदेश जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना दिले आहेत. जिल्ह्यात सोमवारपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी व धार्मिक स्थळी मास्क न वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, धूम्रपान न करणे, परिसरात न थुंकने अशा नियमांचे पालन न करणाऱ्यास १०० रुपये इतका दंड होता. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड ठोठाविण्यात येणार असल्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या आहेत. सदर अधिकार पोलीस नाईक ते पोलीस अंमलदर यांना देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून या दंडाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Web Title: Ahmednagar Violation of Covid 19 rules now carries a fine of Rs 500

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here