Home Accident News ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Kopargaon Accident truck and motorcycle 

कोपरगाव | Accident: कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वार रस्ता ओलांडत असताना समोरून येणारी मालवाहतूक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात मालवाहतूक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारसायकलस्वार वरील चालक हा येवल्याकडे जात असताना मध्यप्रदेश येथील ट्रकवरील चालक आनंद बाबूलाल औसारी याने ट्रक हा भरधाव वेगाने चालवून त्याच्या पुढे चाललेल्या दुचाकी स्वार रस्ता ओलांडताना त्या दुचाकीस्वारास धक्का दिल्याने तो ट्रकच्या मागील बाजूस सापडल्याने जागीच ठार झाला. या अपघातानंतर चालक अपघाताची माहिती न देताच पसार झाला.  याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Kopargaon Accident truck and motorcycle 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here