Home अहमदनगर उसनवारीच्या पैशावरून पती पत्नीस मारहाण

उसनवारीच्या पैशावरून पती पत्नीस मारहाण

Husband beats wife over loan money Crime filed

अहमदनगर | Crime: उसनवारीच्या पैशामुळे पती पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत घरातील वस्तूंची तोडफोड केल्याची घटना शहरातील हॉटेल यश शेजारी असलेल्या चेतन अपार्टमेंट येथे शनिवारी रात्री घडली.

याप्रकरणी भाऊसाहेब अशोक आदमने सध्या रा, नगर यांनी कोतवाली पोलीस ठणयाय फिर्याद दिली असून फिर्यादीवरून उज्वला गवळी व तिचे दोन भाऊ सर्व रा. सुपा ता. पारनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब आदमने यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. ते स्वस्तिक नेत्रालयात सोशल वर्कर म्हणून काम करतात. त्यांनी व्यवसायासाठी त्यांच्या ओळखीच्या उज्वला गवळी यांच्याकडून चार वर्षापूर्वी वेळोवेळी दोन लाख रुपये हात उसने घेतले होते. तसेच दोन वर्षापूर्वी त्यांनी या पैशांची परतफेड केली होती. मात्र उज्वला गवळी गेल्या १ वर्षापासून भाऊसाहेब यांनी पूर्ण पैसे दिले नाहीत पूर्ण पैसे द्या असे म्हणत होत्या. शनिवारी उज्वला गवळी व त्यांचे दोन भाऊ, जावई हे भाऊसाहेब यांच्या घरी आल्या.

गवळी यांच्या भावाने भाऊसाहेब यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केली. पैसे दिले नाही तर गोळ्या घालून मारेल अशी धमकी दिली. तसेच घरातील संसार उपयोगी वस्तूंची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Web Title: Husband beats wife over loan money Crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here