Home Suicide News धक्कादायक: भाजपाचे माजी शहराध्यक्ष यांची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक: भाजपाचे माजी शहराध्यक्ष यांची गळफास घेऊन आत्महत्या

Kopargaon Former BJP city president commits suicide

Suicide Case | कोपरगाव: भाजपचे अत्यंत निष्ठावान कोपरगाव शहर माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे वय ७५ यांनी आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

शिंदे यांच्या आत्महत्या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांची सून वर्षा शिंदे यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्यांच्या खिशात एक चिट्ठी आढळून आली त्यात नेमके काय लिहिले होते यासंदर्भात पोलिसांनी माहिती देण्यास टाळली आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले. राज्यभरात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबध होते. त्यांच्या आत्महत्यामुळे खळबळ उडाली आहे.  

Web Title: Kopargaon Former BJP city president commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here