Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

Kopargaon Husband and wife drown in farm

Ahmednagar | Kopargaon | कोपरगाव: जनावरांसाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून (drown) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारात घडली.  मंगळवार दि ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रावसाहेब शिंदे यांच्या शेतात घडली. या  घटनेने आंचलगाव शिवारात  शोककळा पसरली आहे.

पूजा निलेश शिंदे (वय २२) आणि निलेश रावसाहेब शिंदे (वय २७) असे मृत झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. निलेश हा उच्च शिक्षित होता. आणि वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशी विवाह झाला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  वीज नसल्याने पूजा निलेश शिंदे व तिचा पती निलेश हे जनावरांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले असता निलेशचा पाय शेततळ्याच्या कागदावरून घसरून ते शेततळ्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी पत्नी पुजाने पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे  दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत  कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी माहिती दिली आहे.

या माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. तळ्यातील पाणी कमी करून ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Web Title: Kopargaon Husband and wife drown in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here