Home कोपरगाव अपहरण केलेल्या मुलाचा मृतदेह नदीत आढळला

अपहरण केलेल्या मुलाचा मृतदेह नदीत आढळला

Kopargaon Kidnapped Boy Found in River

कोपरगाव: कोपरगाव शहरातील भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या महिलेचा मुलगा विशाल रमेश भाकरे वय १५ हा सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बेपत्ता झाला होता.

त्याला कोपरगाव बेट येथून अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई सुनीता रमेश भाकरे यांनी दिली होती. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा मृतदेह पुलानजीक मासे पकडणाऱ्या इसमाच्या जाळ्यात अडकल्याने मृतदेह आढळून आला यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी मुलाच्या आईने आपला मुलगा अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करूनही तो सापडला नव्हता. याबाबत काल गोदावरी नदीत मासे पकडणाऱ्या इसमांनी नदीत जाळे लावून ठेवलेले असताना त्यांना जाळ्यात अज्ञात वस्तू अडकलेली आढळून आली. त्यास वर काढून पाहिले असता त्यांना शॉकच बसला त्यांनी लगेचच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांनी गायब झालेल्या मुलाच्या घरी ही बाब कळविली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हे शव गायब मुलाचेच असल्याचे त्यांनी ओळखले. त्यामुळे तत्याचे कोणी अपहरण केले का वा तो नदीत पडला या प्रश्नाची उकल झाली नाही. याबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Kopargaon Kidnapped Boy Found in River

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here