Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात

Sangamner Nashik Pune highway Accident tempo and three-car 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात नाशिक पुणे बाह्यवळण महामार्गावर एक टेम्पो आणि तीन कार यांच्यात भीषण अपघात घडला. हा अपघात शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. या अपघातातील सर्व वाहने नाशिकच्या दिशेने चालली होती.

घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा अपघात झाला. या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती समजताच संगमनेर वाहतूक शाखेचे कर्मचारी व शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्यातील अपघात ग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु होते. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींची नावे अद्याप समजली नाही. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

महामार्गावर उभे राहून पैसे मागणाऱ्या तृतीय पंथीय मदत देणे एका वाहन चालकाला चांगलेच महागात पडले आहे. कार चालक ही मदत देत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने या कार चालकासह चार वाहनांचा विचित्र अपघात घडला. आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने या टेम्पोने समोरील तीनही कारला जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर होऊन टेम्पो दुभाजकावर आदळला. यामध्ये तृतीय पंथासःह कारमधील दोन जण  गंभीर जखमी झाले आहेत. 

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Nashik Pune highway Accident tempo and three-car 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here