Home अहमदनगर Kopargaon: डंपर व दुचाकी धडकेत एक जण ठार  

Kopargaon: डंपर व दुचाकी धडकेत एक जण ठार  

Kopargaon One killed in dumper-bike collision

कोपरगाव | Kopargaon: नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर दुचाकीस डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील चालक हा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला.

नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर कोपरगावहून नाटेगावाकडे जाणाऱ्या दुचाकीस डंपरने धडक दिल्याने बाबुराव किसन मोरे रा. नाटेगाव ता. कोपरगाव हे गंभीर जखमी झाले. त्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डंपर चालक हा मात्र फरार झाला आहे.

याबाबत मयात बाबुराव मोरे यांचा मुलगा पंकज बाबुराव मोरे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर डंपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभा केला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.पी. पुंड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Kopargaon One killed in dumper-bike collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here