Home अहमदनगर चोरट्यांच्या हल्ल्यात महिलेचे दोन्ही कान कापले

चोरट्यांच्या हल्ल्यात महिलेचे दोन्ही कान कापले

Shrigonda Thieves cut off both of the woman's ears

श्रीगोंदा | Shrigonda: जिल्ह्यात चोरट्यांचे सत्र सुरूच आहे. अशीच एक घटना शनिवारी घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे येथे घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून ५० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात विमल महादेव जाधव ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महादेव विमल जाधव हे घरात झोपलेले असताना चोरटे येऊन त्यांनी घराची कडी वाजवली. दरवाजा उघडण्यासाठी धमकी दिली. दरवाजा उघडताच चोरट्यांनी विमल जाधव या महिलेचे दोन्ही कान तोडले व गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने काढून घेत तेथून त्यांनी पळ काढला. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनच पोलीस निरीक्षक दौलतराव अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात चोरट्यांचे सत्र सुरूच आहे.

Web Title: Shrigonda Thieves cut off both of the woman’s ears

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here