Home Suicide News नदीच्या पुलावरून उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

नदीच्या पुलावरून उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

Kopargaon Suicide of a young woman by jumping from a river bridge

कोपरगाव | Kopargaon: तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुंबई नागपूर या राज्यमार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन तरुणीने आपले जीवन संपविले.

पूजा रमेश औताडे वय २६, असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

कोपरगाव येथे संजीवनी सहकारी कारखाण्याच्या संजीवनी कॉलेजसमोर डी टाईप या बिल्डिंग मध्ये ती रहिवाशी होती. तसेच येवला येथे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात ती शिकत होती.

पूजा औताडे ही ५ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजेपासून गायब होती. बेपत्ता असल्याची खबर मुलीच्या आईने कोपरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर तिचा शोध सर्वत्र घेण्यात आला होता. मात्र ती मिळून आली नव्हती.

संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुंबई नागपूर या राज्यमार्गावरील गोदावरी नदी खडकाच्या ठिकाणी पुलाखाली प्रेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ते प्रेत नदीबाहेर काढले. ते प्रेत पूजा औताडे असल्याचे नातेवाईक यांनी पोलिसांना माहिती दिली. मुलीने कशामुळे आत्महत्या केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Kopargaon Suicide of a young woman by jumping from a river bridge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here