Home Accident News शेततळ्यात बुडून तरुण पशु वैद्यकाचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तरुण पशु वैद्यकाचा मृत्यू

Kopargaon Young veterinarian drown in farm

कोपरगाव | Kopargaon: तरुण पशुवैद्यकाचा शेततळ्यात बुडून (drawn) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव शिवारास शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शंकर सोमनाथ गायकवाड वय २६ असे मृत्यू झालेल्या तरुण पशुवैद्यकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर सोमनाथ गायकवाड रा नाटेगाव हे शुक्रवार्री २९ ऑक्टोबर रोजी शेतामध्ये काम करीत असताना ट्रॅक्टर बघण्यासाठी शेजारील असणाऱ्या दत्तात्रय मोरे यांच्या शेततळ्यावर गेले असता त्यांचा तोल गेला असता शेततळ्यात पडले आणि पोहता येत नसल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. परिसरात आरडाओरडा होताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली असता त्याठिकाणी शंकर बुडालेले अवस्थेत दिसून आले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आंधळे हे करीत आहे.  

Web Title: Kopargaon Young veterinarian drown in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here