Home कोपरगाव मोबाईल न दिल्याने एकास लोखंडी रॉडने मारहाण

मोबाईल न दिल्याने एकास लोखंडी रॉडने मारहाण

Kopargaon Youth was beaten with an iron rod

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील एका युवकास मोबाईल न दिल्याच्या रागातून आरोपी तुषार चव्हाण व गणेश लोखंडे या दोघांनी फिर्यादीस लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नितीन विनायक चिटणीस वय ३५ याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नितीन चिटणीस हा संवत्सर येथील रहिवासी आहे. तो आपल्या कुटुंबासोबत राहतो. तो कामासाठी कोपरगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गेला होता. तो सकाळी साईबाबा कॉर्नर येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होता. तो उभा असताना तेवढ्यात दुचाकीवरून दोन तरुण आले. व त्यांनी त्याच्याकडे अनाधिकाराने मोबाईल मागितला. मात्र नितीनला त्यांचा दारूचा वास आल्याने मोबाईल देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यास शिवीगाळ केली. ते तेथून निघून गेले मात्र काही वेळातच पुन्हा येऊन त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडच्या लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली. तसेच जाताना तू आमच्या नादी लागशील तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यांनतर मित्रांनी नितीनला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Kopargaon Youth was beaten with an iron rod

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here