राहाता: अभिलेख कार्यालयातील भूमि अभिलेखपाल लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Ahmednagar News: जमीन मोजणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना राहाता येथील अभिलेख कार्यालयातील भूमि अभिलेखपाल लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ.
राहाता: जमीन मोजणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्विकारताना राहाता येथील अभिलेख कार्यालयातील भूमि अभिलेखपाल लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. भूमि अभिलेखपाल वर्ग 3 विकास सूर्यभान दुशिंग (वय 51) यांना २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
याप्रकरणी कोल्हार येथील तक्रारदाराने बाभळेश्वर बुद्रुक येथील गट क्रमांक व उपविभाग 65 मध्ये 1 हेक्टर 52 आर शेती क्षेत्र विकत घेतले. सदर क्षेत्राची तक्रारदार यांनी खासगी मोजणी केली असता 32 आर क्षेत्र कमी भरले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सदर क्षेत्राची मोजणी होणे करिता 2022 मध्ये राहाता येथील दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार दिवाणी न्यायालयात दावा क्रमांक 151/2022 चालू होता. सदर दाव्यामध्ये न्यायालयाने दि. 4 फेब्रुवारी 23 रोजीच्या आदेशात उपअधीक्षक भूमी अभिलेख राहाता यांनी सदर जमिनीचा नकाशा व रिपोर्ट दि. 10 मार्च 2023 पावेतो सादर करण्यास आदेशीत केले होते.
त्यानुसार तक्रारदार यांनी वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालय राहाता येथे जाऊन यातील आरोपी लोकसेवक दुशिंग यांना नकाशा व रिपोर्ट तयार करून न्यायालयात सादर करा याबाबत विनंती केली होती. दि. 20 जून 2023 रोजी यातील आरोपी लोकसेवक दुशिंग यांनी नकाशा व रिपोर्ट तयार केला होता. परंतु कोर्टात पाठविला नव्हता. म्हणून यातील तक्रारदार यांनी दि. 2 जुलै 2023 रोजी यातील आरोपी लोकसेवक दुशिंग यांना भेटून नकाशा व रिपोर्ट न्यायालयात पाठवण्याची विनंती केली असता आरोपी लोकसेवक दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या बाजूने नकाशा व रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणी केली.
ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल 5 जुलै रोजी सापळा लावला. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालय राहाता येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी पंचासमक्ष 25 हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार काल भूमिअभिलेख कार्यालय राहाता येथे सापळा लावला असता यातील आरोपी लोकसेवक दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 25 हजार रुपये लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
हा सापळा अहमदनगर येथील पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या पथकाने टाकला. पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हरुन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी लोकसेवक दुशिंग यांचेविरुध्द राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Web Title: Land recorder in Rahata Records office in bribe Case
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App