Home महाराष्ट्र शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदार  संपूर्ण यादी समोर, कोण ठरलं...

शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदार  संपूर्ण यादी समोर, कोण ठरलं वरचढ?

Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा फडकवून उप मुख्यमंत्रीम्हणून शपथ घेतली. कृती पक्षविरोधी असल्याचे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

Full list of how many MLAs and MPs Sharad Pawar has with Ajit Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आपले काका यांना आव्हान देऊन स्वतःची वेगळी चूल मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संख्याबळाच्या लढाईत बाजी मारल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. चाळीसहून अधिक आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांच्याकडे आजच्या घडीला ३३; तर शरद पवार यांच्याकडे १८ आमदार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. नवाब मलिक आणि सरोज अहिरे या आमदारांनी दोन्ही गटांच्या बैठकांकडे पाठ फिरवून भूमिका उघड केली नाही. विधानसभेतील ५३ पैकी सर्वाधिक  ३३ आमदार आपल्या बाजूला वळवून अजित पवार यांनी तूर्तास पक्षांतगर्त सरशी मिळवली आहे.

अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा फडकवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनीही शपथ घेतली. अजित पवार यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत दोन्ही गटाकडे विधानसभेतील किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार यांच्या गटाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. या बैठकीसाठी खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले ९ आमदार वगळता सर्व आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा आज फोल ठरला. आजच्या बैठकीला विधानसभेतील १६, विधान परिषदेतील तीन आमदार; तर लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून पाच खासदार उपस्थित होते.

अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला विधानसभेतील ३३ आमदारांसह, विधान परिषदेतील रामराजे नाईक निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे हे आमदार; तर संसदेतील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खासदार उपस्थित होते त्यामुळे राष्ट्रवादीतील आजच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवार सरस ठरल्याचे चित्र दिसले.

अजित पवार यांच्याकडील आमदार

छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील(आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी) आदिती तटकरे (श्रीवर्धन), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे(तुमसर), आशुतोष काळे (कोपरगाव), माणिकराव कोकाटे (सिन्नर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव) दिपक चव्हाण (फलटण), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), इंद्रनील नाईक (पुसद), शेखर निकम (चिपळूण), नितीन पवार (कळवण), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), राजेश पाटील (चंदगड), दिलीप बनकर (निफाड), अण्णा बनसोडे (पिंपरी), अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), यशवंत माने (मोहोळ), दिलीप मोहिते (खेड आळंदी), नीलेश लंके (पारनेर) बबनराव शिंदे (म्हाडा), सुनील शेळके (मावळ), प्रकाश सोळंके (माजलगाव), देवेंद्र भोयार (अपक्ष, मोर्शी)

विधान परिषद सदस्य- सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, रामराजे निंबाळकर

लोकसभा आणि राज्यसभा सदस्य : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल

शरद पवार यांच्याकडील आमदार

जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल ), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), अशोक पवार (शिरूर) मकरंद पाटील (वाई), प्राजक्त तनपुरे (राहुरी), चेतन तुपे (हडपसर), चंद्रकांत नवघरे (बसमत), रोहित पवार(कर्जत जामखेड), सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), किरण लहामटे (अकोले), संदीप क्षीरसागर(बीड), मानसिंग नाईक (शिराळा), दौलत दरोडा (शहापूर). यापैकी मकरंद पाटील, नवघरे आणि दरोडा बैठकीला उपस्थित नव्हते. विधान परिषद सदस्य : एकनाथ खडसे, बाबाजान दुराणी, शशिकांत शिंदे, खासदार : श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान.

Web Title: Full list of how many MLAs and MPs Sharad Pawar has with Ajit Pawar

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here