Home क्राईम बाथरुमधून मुलगी प्रियकरासोबत बाहेर आली, उलट्या करु लागली, प्रियकरही… नांदेड हादरलं

बाथरुमधून मुलगी प्रियकरासोबत बाहेर आली, उलट्या करु लागली, प्रियकरही… नांदेड हादरलं

Nanded Crime: घरातील मंडळीकडून लग्नास नकार मिळत असल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजले आणि त्यांनतर स्वतः विष प्राशन करुन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची घटना, प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू.

boyfriend poisoned his girlfriend and then committed suicide by taking the poison himself

नांदेड: घरातील मंडळीकडून लग्नास नकार मिळत असल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजले आणि त्यांनतर स्वतः विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे घडली आहे. या घटनेत प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुप्रिया मारोती जाधव असं या मृत तरुणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत तरुणी ही आपल्या आई आणि भावासोबत लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथील रहिवासी होती. सध्या  ती बीए प्रथम वर्षला शिक्षण घेत होती. याच गावात रोहिदास पद्माकर जाधव हा तरुण राहत होता. नाते संबंध असल्याने रोहिदास हा नेहमी घरी यायचा. याच दरम्यान त्याची ओळख सुप्रियासोबत झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ही बाब उघडकीस आल्यानंतर रोहिदास याच्या आई वडिलांनी लग्नाची मागणी घातली होती. मात्र, मुलीच्या आईने रोहिदासला आपली मुलगी देण्यास नकार दिला.

लग्नास नकार मिळत असल्याने प्रेमीयुगुल नाराज होते. याच दरम्यान, ३ जुलैच्या मध्यरात्री रात्री रोहिदास हा सुप्रियाच्या घरी गेला. ४ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई यांना जाग आली. सुप्रिया त्यांना तिच्या खोलीत दिसली नाही. थोड्या वेळाने सुप्रिया बाथरूमधून बाहेर आली आणि तिच्या मागोमाग रोहिदास जाधव हा देखील बाहेर आला.

त्यानंतर रोहिदास हा वाड्याचे दार काढुन तेथून निघुन गेला. काही वेळातच सुप्रियाला उलट्या होऊ लागल्या. लक्ष्मीबाई यांनी तिची विचारपूस केली असता तिला रोहिदासने स्प्राईटच्या बाटलीमध्ये आणलेले कोणते तरी विषारी औषध पाजले आहे, असे तिने सांगितले. दरम्यान, थोड्याच वेळानंतर रोहिदासने सुप्रियाला फोन केला आणि आपणही विष पिल्याचे सांगितले.

या प्रकारानंतर सुप्रियाला शेजाऱ्यांनी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रोहिदासला देखील त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सुप्रियाचा मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीबाई जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरुन उस्माननगर पोलीस ठाण्यात रोहिदास जाधव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: boyfriend poisoned his girlfriend and then committed suicide by taking the poison himself

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here