अहमदनगर ब्रेकिंग: इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन भीषण आग, होरपळून दोघांचा मृत्यू
Ahmednagar News: इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन टँकरला भीषण आग (Fire) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील केळवंडी शिवारात माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याशी आज सकाळी एका वळणावर ज्वालाग्रही रसायनाची (इथेनॉल) वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन टँकरला भीषण आग (Fire) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान या टँकरमध्ये असलेल्या एक पुरुष व एका महिलेचा मृत्यू झाला असुन चार जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत असून जखमींवर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला केळवंडी शिवारात वळणावर गुरुवारी (दि.6) सकाळी 11 वाजेच्या दरम्यान इथेनॉल वाहतुक करणारा टँकर उलटून अपघात झाला. टँकरमध्ये एकूण सहा प्रवाशी होते. त्यातील चौघांनी टँकरमधून उड्या मारल्या.
तर दोघांना बाहेर निघता न आल्याचे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना पाथर्डी मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना नगरला हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आग अटोक्यात आणली. पोलीसांनी टँकर मधील मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले आहेत. मृतदेह पुर्ण पणे जळाले असुन काही भागच शिल्लक राहिला असुन पाथर्डी येथील उप जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. अधिक तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.
Web Title: Tanker carrying ethanol overturned and caught fire, two died
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App