Home महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा,  हवामान विभागाचा अलर्ट

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा,  हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Forecast:  हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Weather Forecast Alert of heavy rain with lightning in these districts of the state

मुंबई : कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई हवामान विभागाने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला.

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह नाशिक जिल्ह्यातही पाऊस पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातही पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई हवामान विभागाने पुढील ३ ते ४ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. जळगाव धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मुंबई हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांनाही इशारा दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

Web Title: Maharashtra Weather Forecast Alert of heavy rain with lightning in these districts of the state

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here