Home नाशिक छतावरील पाण्याच्या टाकीत एकाची आत्महत्या

छतावरील पाण्याच्या टाकीत एकाची आत्महत्या

Nashik News : राहत्या घरातील छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या (Suicide) केली असावी, असा अंदाज. 

One commits suicide in rooftop water tank

नाशिक: राहत्या घरातील छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भूषण भारंबे (४१), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (ता. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूषण हे घरात दिसत नसल्याने घराचे छतावर गेले असता, एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत भूषण यांचा मृतदेह दिसला. मयत भूषण यांचे आईवडील घरात होते, व पत्नी नोकरीवर गेलेल्या होत्या.

यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भूषण यांना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंगावर कुठलेही व्रण नसल्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष संगम करीत आहे. मयत भूषण हे खासगी नोकरीला होते. तर त्याची पत्नीही खासगी नोकरी करत आहे.

Web Title: One commits suicide in rooftop water tank

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here