Home नाशिक पोलीस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

पोलीस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

Nashik Bribe Crime: नाशिक रोडचे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक यांना 15000 रुपयाची लाच (Bribe) घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे.

Police sub-inspector caught taking bribe of 15,000

नाशिक: नाशिक रोडचे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांना 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेने नाशिक रोड पोलीस स्टेशन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नासिक रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला 354 च्या गुन्ह्यात मदत करणार या आश्वासनावर 25 हजाराची लाच काकड यांनी मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

25 हजाराहून हे डील 15 हजारावर करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नासिक रोड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस गणपत काकड यांना पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. यासंदर्भात गणपत काकड यांच्यावर गुन्ह्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Police sub-inspector caught taking bribe of 15,000

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here