Home Accident News बस पलटी, २५ जण जखमी

बस पलटी, २५ जण जखमी

Satara: पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवडे गावाच्या हद्दीत कर्नाटकच्या विजयपूर- सातारा या बसला अपघात (Accident).

Accident Bus overturned, 25 injured

उंब्रज | सातारा:  पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवडे गावाच्या हद्दीत कर्नाटकच्या विजयपूर- सातारा या बसला अपघात झाला. बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. अपघातात एसटीतील चालक व वाहकासह २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उंब्रजच्या खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.

अपघाताने मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत बसच्या पुढील व मागील बाजूच्या काचा फोडून त्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. भरधाव वेगामुळे चालकाचा ताबा सुटला आणि अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. पोलिसांनी एसटी चालक धर्माप्पा निमप्पा नाईक (रा. मेडिकेटवर, जि. विजयपूर) यांच्यावर गुन्हा नोंद केला.

Web Title: Accident Bus overturned, 25 injured

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here