Home संगमनेर संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता यांना शिवीगाळ व मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता यांना शिवीगाळ व मारहाण, गुन्हा दाखल

घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील केळेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्याचा शेतकरी अवैधरित्या पाणी उपसा करीत असताना हे पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलीस स्टेशनला आठ शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता रजनीकांत कवडे, चौकीदार के.एम.ढोमसे, डी.एम.आरोटे, महावितरणाचे वायरमन मिसाळ, नितीन लहामखडे हे सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास केळेवाडी येथील धरणातील होणारा पाण्याचा उपसा बंद करण्यासाठी गेले असताना तेथील विद्युत पुरवठा बंद करीत असताना तेथील लाभधारक शेतकरी राजू किसन लामखडे, सुभाष धोंडीबा लामखडे, अतुल कोंडीभाऊ लामखडे, गणेश म्हतू लामखडे, संतोष यमनाजी लामखडे, सुभाष धोंडीबा लामखडे, उत्तम सोपान लामखडे, एकनाथ दामू लहामखडे  रा, सर्व केळेवाडी हे सर्व संचारबंदी असताना एकत्र येऊन विना परवाना जमा झाले. यामधील राजू किसन लामखडे, एकनाथ दामू लहामखडे, संतोष यमनाजी लामखडे यांनी विद्युत कनेक्शन का तोडता? असे म्हणून अभियंता रजनीकांत कवडे व कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. अशी फिर्याद अभियंता रजनीकांत कवडे यांनी घरागाव पोलिसांत दिली आहे. यावरून या आठ शेतकऱ्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Website Title: Latest News Abuse and beating of Assistant Engineer Sangamner   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here