Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात तीन करोनाबाधितांना डिस्चार्ज, २३ पैकी २० अहवाल निगेटिव्ह  

अहमदनगर जिल्ह्यात तीन करोनाबाधितांना डिस्चार्ज, २३ पैकी २० अहवाल निगेटिव्ह  

अहमदनगर: जिल्ह्यातील आणखी ८ करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्यांचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. या आठ पैकी नेवासा येथील एक व जामखेड येथील दोघांना मंगळवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

नेवासा येथील एका करोनाबाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर जामखेड येथील ४ तर संगमनेर येथील ३ करोनाबाधित व्यक्तींचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ असून त्यापैकी २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar three discharge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here