Home अहमदनगर अनैतिक संबधातून प्रियकराच्या मदतीने दिराचा केला खून

अनैतिक संबधातून प्रियकराच्या मदतीने दिराचा केला खून

श्रीगोंदा: आढळगाव येथील महिलेने अनैतिक संबधातील अडसर दूरू करण्यासाठी आपला प्रियकर दत्तात्रय अंकुश पठाडे याच्या मदतीने आपला दीर मुकुंद जयसिंग वाकडे रा. आढळगाव याचा खून केल्याचे उघड झाले आहे. मयताच्या भावजायीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

तीन वर्षापासून आरोपी दत्तात्रय पठाडे व संभधीत महिलेचे सुत जुळले. आरोपीने या महिलेला आपल्या घराजवळ शेती वाट्याने करून दिली. त्यामध्ये भागीदारी करण्यात आली. पती पत्नीसारखे दोघेही फिरायचे मौजमजा करायचे मयत मुकुंद जयसिंग वाकडे हा बांधकाम व्यवसाय करीत होता. लॉकडाऊनमुले कामे बंद झाले. मुकुंदने भावजयीशी शारीरिक संबध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिने ही माहिती आपला प्रियकर दत्तात्रय अंकुश पठाडे याला दिली.

मुकुंदचा वावर हा नेहमी लोकांसोबत असल्याने दत्तात्रय पठाडे याला मुकुंदवर हल्ला करता आला नाही. शनिवारी संध्याकाळी मुकुंद हा आपल्या डाळिंबाच्या बागेत औषध फवारणी करण्यासाठी ट्रक्टर घेऊन गेला. हे भावजयीने हेरले आणि दत्तात्रय पठाडे याला माहिती दिली. दत्तात्रय पठाडे हा चाकू घेऊन आला. डाळिंबाच्या बागेत ट्रक्टर सुरु करून दत्तात्रयने मुकुंदच्या छातीवर वार केला. दोन वार करून मुकुंदचा खून केला.

घटनास्थळी दत्तात्र्याचा जराकीनचा खिसा तुटून पडला त्याने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी एका विहिरीत चाकू कपडे जर्किन फेकून दिले.पण जर्किन विहिरीत एका झाडाला अडकले. दत्तात्रय पुन्हा मुकुंदच्या अंत्यविधीला हजर झाला तेथे रडण्याचा डोंगीपणा केला असे पोलिसांनी सांगितले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी तपासाची चक्रे फिरविली. २४ तासांच्या आत दत्तात्रय पठाडे याला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या कटात संबधीत महिला सामील असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. याप्रकरणी या महिलेस अटक करण्यात आली आहे.   

Website Title: Latest News murdered with the help of her boyfriend Ahmednagar    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here