Home अहमदनगर पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीगोंदा(जि. अहमदनगर):  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यानजीक एका पित्याने स्वतः च्या अल्पवयीन मुलीवर शनिवारी मध्यरात्री शारीरिक अत्याचार केला. यापूर्वीही या नराधम पित्याने काही महिन्यांपूर्वी प्रयत्न केला होता. मात्र गयावया केल्यामुळे पिडीतीने व तिच्या आईने कुठलीही तक्रार नोंदविली नव्हती. शनिवारी मध्यरात्री त्याने पुन्हा अत्याचार केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी पिडीत मुलीची आई, भाऊ हे शेजारी त्यांच्या नातेवाइकांनाचे मुल रडत असल्याने त्यांच्याकडे गेले होते. तरी पिडीत मुलीचा पिता हा घराच्या गच्चीवर झोपायला जातो अस सांगून घराच्या आतील खिडकीच्या मागे लपून बसला आई आणि भाऊ घराबाहेर गेल्यानंतर पिडीत मुलगी घराचा दरवाजा बंद करून झोपली. त्यांनतर खिडकीच्या मागे लपवून बसलेल्या बापाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

सकाळी आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पित्याविरोधात अत्याचार व  पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक दौलतराव जाधव यांनी आरोपीस अटक केली आहे.

Website Title: Latest News Abuse of a minor daughter by a father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here