Home महाराष्ट्र मला राजकारण करायचे नाही, करणाऱ्यांना करू द्या:उध्दव ठाकरे

मला राजकारण करायचे नाही, करणाऱ्यांना करू द्या:उध्दव ठाकरे

मुंबई: करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला.

उध्दव ठाकरे यांनी करोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. सणवार घरात बसून साजरे केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. राज्यात राजकारण करीत असलेल्या भाजपाला नाव न घेता टोला लगाविला. मी राजकारण बाजूला ठेवून करोनाविरोधात लढत आहे. मात्र काही जनाकडून राजकारण होत आहे मला त्या फंदात पडायचे नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील करोनाबाधितांचा आकडा हा वाढत आहे. याबाबत आम्ही तयारी केली आहे. मात्र काही जणांकडून राजकारण केल जात आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. मी यात फंदात पडत नाही. मी राजकारण बाजूला ठेऊन या लढाईत लढत आहे. सध्या करोनाच्या लढाईला प्राधान्यक्रम माझा आहे.

Website Title: Latest News I don’t want to do politics Uddhav Thakare 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here