Home अकोले अकोले तालुक्यात करोना संशियीत रुग्ण आढळल्याने ग्रामस्थ धस्तावले

अकोले तालुक्यात करोना संशियीत रुग्ण आढळल्याने ग्रामस्थ धस्तावले

अकोले: तालुक्यातील तांबोळ येथील एका करोना संशियीत रुग्णाला तपासणीसाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ धस्तावले आहेत.

दरम्यान अकोले तालुक्यात आत्तापर्यंत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभिरे यांनी सांगितले.

तांबोळ येथील १९ वर्षाचा रुग्ण परगावाहून तेथे आला. मागील तीन दिवस त्याला सर्दी, थंडी ताप अशी लक्षणे दिसून येत होती. ही माहिती अकोले येथील आरोग्य विभागाला कळल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेतले गेले आहे आणि नगर येथे हलविण्यात आले आहे असे डॉ. गंभिरे यांनी सांगितले आहे. त्याबाबतचा अहवाल उद्या येणे अपेक्षित आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. थंडी ताप सर्दी अशी लक्षणे जरी त्यांच्यामध्ये असली तरीही लोकांनी घाबरून जाऊ नये अशा प्रकारचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.

डॉ. गंभिरे म्हणाले १८ हजार  ३०६ लोकांना होमकॉराटाइन केले गेले होते. त्यापैकी फक्त ५५० रुग्ण सध्या होमकॉराटाइन मध्ये शिल्लक आहे. बाकीच्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना होमकॉराटाइनपासून मुक्त करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

अकोले तालुक्यात ३७ संभाव्य रुग्ण म्हणून तपासले गेले परंतु त्यामध्ये एकही करोनाबाधित आढळला नाही.आज तांबोळच्या युवकाचा तपासणी अहवाल हाती आल्यानंतर त्याबाबत भाष्य करणे उचित ठरेल.

जनतेने घरातच थांबावे, घरातून बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर ठेवून सर्व व्यवहार सुरु ठेवावे.   

आत्ताची ब्रेकिंग:

आज डॉ. गंभिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा नमुना अहवाल हा निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी समाधानाचा सुस्कारा टाकला आहे.

Website Title: Latest News corona suspect patient in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here