Home अकोले अकोले पंचायत समितीचे सभापती यांचे अपघाती निधन

अकोले पंचायत समितीचे सभापती यांचे अपघाती निधन

अकोले: अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे वय ५५ यांचे केळी ओतूर येथे राहत्या घरी विहिरीचे काम चालू असताना ते विहिरीत पडले. त्यांच्यावर नाशिक येथे शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले.

अकोले तालुक्यात केळी ओतूर येथे राहत्या घरी विहिरीचे काम चालू असताना ते विहिरीत पडले. त्यानंतर तत्काळ त्यांना नाशिक येथे शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी २ मुले १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दत्तात्रय बोऱ्हाडे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. सातेवाडी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून ते निवडून आले होते. Website Title: Latest News Accidental death of Akole Panchayat Samiti chairperson 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here