Home अकोले मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा भंडारदरामध्ये बुडून मृत्यू

मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा भंडारदरामध्ये बुडून मृत्यू

भंडारदरा: अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या एका वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक २१ मे ला समोर आली. श्रावणा सोमनाथ मधे वय ६५ असे या मयत वृद्धाचे नाव आहे. तो अकोले तालुक्यातील चिंचोडी येथील रहिवासी आहेत.

याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २० मे रोजी श्रावणा मधे हे नेहमीप्रमाणे सकाळीच जेवणाचा डबा घेऊन भंडारदरा धरणावर गळ टाकून मासे पकडणेसाठी गेले होते. नेहमीप्रमाणे सकाळी गेलेले आपले वडील श्रावणा मधे हे नेहमी सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येत्तात मात्र रात्री ते घरी का परतले नाही. याबाबत त्यांचा मुलगा नवसू मधे दिनांक २१ मे रोजी भंडारदरा धरणावर जाऊन दिवसभर शोधा शोध केली. सायंकाळी या वृद्धाचा मृतदेह भंडारदरा धरणाच्या वालसमोर तरंगलेला अवस्थेत आढळून आला.

वाचा: संगमनेर विलगीकरण कक्षातून पळून जाणे पडले महागात 

याबाबत राजूर पोलिसांत नवसू मधे यांनी खबर दिली. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक तळपे हे करीत आहे.

Website Title: Latest News One drowned in Bhandardara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here