Home अकोले अकोले तालुक्यात लिंगदेव येथे करोना बाधित आढळून आल्याने खळबळ

अकोले तालुक्यात लिंगदेव येथे करोना बाधित आढळून आल्याने खळबळ

अकोले:  अकोले तालुक्यात अजून एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नव्हता मात्र अकोले तालुक्यात लिंगदेव येथे  मागील बारा दिवसांपूर्वीच मुंबई येथून  परतलेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील बारा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील वाशी येथील कार्यरत असणारी व्यक्ती आपल्या मूळ गावी परतली होती. त्या व्यक्तीला लिंगदेवच्या जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी २२ मे ला त्याच्या घशात त्रास जाणवू लागल्याने संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात स्वॅब  घेण्यात आले असून तो मुंबईतील खासगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे त्यातून त्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तीला करोनाची लागण असल्याचे समजताच अकोले तालुकाचे तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी इंद्रजीत गंभिरे व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हि व्यक्ती मुंबईहून आल्यापासून विलगीकरण कक्षात असल्याने संसर्ग संक्रमण होण्याची शक्यात कमी आहे. मात्र प्रशासनाने खबरदारी म्हणून सदर व्यक्तीला डबा व इतर बस्तू पुरविणाऱ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती व विलगीकरण कक्षातील अन्य लोकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या व्यक्तीची सरकारी तपासणीसाठी  स्वॅब नगरला पाठविण्यात येणार आहे. तो अहवाल महत्वाचा असणार आहे असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  मुंबईतून अकोलेतील ग्रामीण भागात करोनाने प्रवेश केल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Website Title: Coronavirus started in akole taluka lingdev 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here