अकोलेतील करोनाबाधित रुग्णासह ११ जणांना नगरला हलविले, लिंगदेव लॉकडाऊन
अकोले: अकोले तालुक्याने करोनाला रोकून धरले होते मात्र मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय करोना तपासणीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोल्यात प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सदर व्यक्ती व त्याचा मुलगा व इतर नऊ अशा ११ जणांना अहमदनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. त्यांचा सरकारी तपासणी अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, १२ मे रोजी घाटकोपर भटवाडी मुंबई येथील एक ५६ वर्षीय शिक्षक आपल्या इयता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलासह मुंबईहून दुचाकीवर लिंगदेवला आले. पत्नीलाहि यापूर्वीच पाठवून दिले होते. स्थानिक प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी कर्मचार्यांच्या माध्यमातून शाळेवर कोरांटाइन होण्यास सांगितले यांनतर तो शिक्षक व मुलगा हे दोघे माळावरच्या शाळेत १० दिवस कोरांटाइन राहिले. कोरांटाइनचा कालावधी संपल्यानंतर ते होमकोरांटाइन झाले. होम कोरांटाइनचा काल चौथा दिवस होता. दोन दिवसांपूर्वी या शिक्षकाला घशात त्रास होऊ लागल्याने तो स्थानिक डॉक्टरांकडे गेला असता त्यांनी त्याला संगमनेरला जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
वाचा: संगमनेर तालुक्यात दारू पिणाऱ्या पतीस पत्नी व मुलाकडून मारहाणीत मृत्यू
तहसीलदार मुकेश कांबळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभिरे, ग्रामसेवक तलाठी तातडीने लिंगदेवला दाखल झाले. तेथे जाऊन रुग्णांची सर्व माहिती घेण्यात आली. फाफाळे वस्ती कन्टेटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच लाहितकडून लिंगदेवला जाणारा रस्ताही बंद करण्यात आला. गावही लॉकडाऊन करण्यात आले आहे. सदर व्यक्ती व त्याचा मुलगा व इतर नऊ अशा ११ जणांना अहमदनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. त्यांचा सरकारी तपासणी अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Website Title: News Akole coronary patient, were evacuated to Ahmednagar lingdev lockdown