Home अकोले अकोले: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा सुरूंग आ. वैभव पिचड शिवसेनेत की भाजपात

अकोले: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा सुरूंग आ. वैभव पिचड शिवसेनेत की भाजपात

अकोले: राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना शह देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांना बरोबर गळाला लावले आहे. आठवडाभर चाललेल्या या पक्ष बदला विषयीचे खलबत्यांना आज (ता.२४) सकाळी विखे पाटलांसह आमदार वैभव पिचड यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थान गाठले आहे. जागा वाटपात अकोल्याची जागा शिवसेनेकडे असली तरीही अकोल्यात उमेदवार कोणता द्यायचा व वैभव पिचडांचे काय करायचे याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समते आहे. मात्रा राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचडांच्या या पक्षबदलाच्या भूमिकेने जिल्ह्याच्या राजकारणात मोठा फेरबदल झाल्याचे दिसून येते त्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार असल्याने राज्यभरात देखील निवडणूकीच्या तोंडावर मोठे राजकीय सुरूंग लागणार आहेत. 

नगर चे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप  हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्या अफवांचे पिक जिल्‌ह्यात मध्यंतरी माजले होते. ३५ वर्षापासून अकोल्याची एकहाती सत्ता राखणाऱ्या पिचडांना भाजपाच्या गळाला लावण्यात यश आले आहे. मात्र आमदार वैभव पिचड यांनी मातोश्रीला भेट दिल्यानंतर आता वर्षा गाठल्याने त्यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार हे आता निश्चित झाले आहे.

आ्. पिचडांना भाजपामध्ये आणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना राजकीय शह देण्याच्या रणनीती ने त्यांचे परंपरागत विरोधक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आखली आहे.

अकोल्यातील भाजप शिवसेनेची ताकत  वाढली आहे. आतापर्यंत बहुरंगी लढतीत पिचडांनी त्यावर मात केली. व सत्तेची लढाई जिंकली परंतू मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सेनेने दाखवलेली ताकत पिचडांच्या जिव्हारी लागली असल्याने तालुक्यातील इतर विरोधकांचा आलेख रोखायचा असेल तर त्यांना विरोधकांच्या पक्षात प्रवेश मिळवल्याशीवाय दुसरा पर्याय नाही, अन्यथा आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्या साठी कठिण ठरू शकते. त्यामुळे आ. वैभव पिचडांनी भाजपा प्रवेश निश्चत केला आहे असे समजते. त्याचबरोबर आ. पिचडांचे विरोधक मात्र या भाजप प्रवेशाबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. व त्याचबरोबर अकोल्याची जागा शिवसेनेची असल्याने आता ती भाजप लढवणार की शिवसेना हे देखिल महत्वाचे आहे.

Website Title: Latest News Akole: Vaibhav Pichad’s BJP Admission Confirmed: BJP’s Tunnel in NCP’s Balekile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here