Home अकोले अकोले : शेंडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना जळक्या, कच्च्या भाकऱ्या; जि. प...

अकोले : शेंडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना जळक्या, कच्च्या भाकऱ्या; जि. प सदस्या सुनिता भांगरे यांची अचानक भेट

अकोले : शासकीय व बिगर शासकीय अनुदानित, बिगर अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधून विद्यार्थ्यांची कशी हेळसांड होते, त्यांना जळक्या, कच्च्या भाकऱ्या खाव्या लागतात हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अध्यक्ष तथा जि. प. सदस्य सुनीता भांगरे यांना प्रत्यक्ष बघायला मिळाले. 

मंगळवारी सायंकाळी भांगरे यांनी शेंडी येथील आदिवासी उन्नती मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेला भेट दिली. तेथील गचाळपणा बघून त्यांनी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांना खायला देण्यात येत असलेल्या जळक्या व कच्च्या भाकऱ्या पाहून त्या संतापल्या. या भाकऱ्या माणसांना खाण्यायोग्य नव्हत्या. नाश्त्यासाठी भिजत चवळीमध्ये सोंडे, किडे तरंगत होते. भाकरी बनवण्यासाठीचे बाजरीचे पीठ उघड्यावर पडले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाच्या बाजूलाच असून तेथून प्लास्टिकच्या बादलीतून पाणी घेऊन जावे लागत असल्याचे मुलींनी सांगितले. 

या शाळेसाठी प्रवरा नदीतून पाणीपुरवठा योजना असताना पाण्याची चांगली व्यवस्था करण्यात आलेली नाही. शाळेत मुलींची संख्या लक्षणीय असूनदेखील तेथील अधीक्षिकेचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संस्थाचालकांनी यात लक्ष घालावे, असे भांगरे यांनी सांगितले. भोजनगृह, स्वच्छतागृह सगळीकडे अस्वच्छता आढळल्याने मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना भांगरे यांनी धारेवर धरत जाब विचारला. याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असून संस्थाचालकांचेही लक्ष वेधणार आहेत, असे त्या म्हणाल्या. 

सुनीता भांगरे यांनी दिलेल्या भेटीत अनेक धक्कादायक प्रकार उघड 
अकोले तालुक्यातील शेंडी येथील अनुदानित आश्रमशाळेला जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे भेट दिली असता जळक्या व कच्च्या भाकऱ्या त्यांना पहायला मिळाल्या. 

चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार
काही वर्षांपूर्वी राज्याच्या प्रकल्पाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी आदिवासी आश्रमशाळांची पाहणी केली करून अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शेंडीतील आश्रमशाळेसाठी शासनाने लाखो रुपये खर्चून स्वतंत्र नळपाणी योजना केली आहे, पण योजना नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. योग्य आहार मिळत नाही. स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. स्वयंपाकगृह परिसरात अस्वच्छता आहे. याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सुनीता भांगरे म्हणाल्या. 

कधीही तक्रारी नाही…
सुनीता भांगरे यांनी आश्रमशाळेत कधी भेट दिली, याबद्दल मला माहिती नाही. या आश्रमशाळेबाबत माझ्याकडे कधीही तक्रारी आलेल्या नाहीत. एक महिन्यापूर्वी मी भेट दिली तेव्हा भोजन व्यवस्थित होते. पिण्याची पाणी योजना सुरू आहे. जेवणात भेंडीची भाजी होती, भात होता, डाळ होती, भाकरी व्यवस्थित होती. या आश्रमशाळेबाबत तक्रार करायला जागा नाही.” संतोष ठुबे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, राजूर. 

Website Titel: Latest News Akole : Children In Tribal Ashram Shandi In Shenandi Burnt, Raw Bread

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here