अकोले : दोन बोगस बोगस डॉक्टर पकडले; राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अकोले : तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने छापा मारून तालुक्यातील मान्हेरे व अंबेवगन येथील दोन बोगस डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करताना काल पकडले. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर अकोले आरोग्य विभाग सतर्क झाला होता. तालुका वैद्यकीय अधिकारी इंद्रजित गंभीरे यांना मिळालेल्या माहिती व तक्रारीवरून काल सोमवार दि. २२ जुलै २०१९ रोजी दुपारी त्यांनी पथक घेऊन मान्हेरे येथे विश्वास गोलक गोविंद (मूळ रा. पश्चिम बंगाल) व अंबेवगन येथे पालस राय (मूळ रा. पश्चिम बंगाल) हे बोगस वैद्यकीय व्यवसाय करून गावातील लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने त्यांना पकडले. राजूर पोलीस ठाण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ चे कलम ३३ (२)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश निमसे करीत आहेत..
अकोले तालुका मोठा व डोंगरदऱ्याचा अतिदुर्गम आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी गावांमध्ये अनेकदा लोकांना पर्याय नसल्याने या मुन्नाभाईंच्या दारात जावे लागते. याचा फायदा घेऊन हे मुन्नाभाई डाक्टर आपले बस्तान बसवतात. आजच्या या कारवाईने निश्चित या प्रकाराला पायबंद बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Website Title: LATEST NEWS ACOLE: Two Bogus Bogus Doctors Caught; Rajur Police Station Lodged A Crime