Home अहमदनगर Latest News: अहमदनगरमध्ये करोनाचा दुसरा मृत्यू

Latest News: अहमदनगरमध्ये करोनाचा दुसरा मृत्यू

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील करोनाबाधित महिलेचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला आहे. आता अहमदनगर करोना मृत्यूची संख्या दोन झाली आहे.

या महिलेचा दिनांक १० एप्रिलला करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटल येथे विलगीकरण करण्यात आला आहे. दोन दिवसात तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार घेत असताना मंगळवारी दिनांक १४ एप्रिलला तिचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २७ झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर येथील करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान राज्यात मागील १२ तासांत १२१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर राज्यातील एकूण आकडा २४५५ वर पोहोचला आहे. राज्यात सरासरी १०० करोना रुग्ण सापडत आहे.

Website Title: Latest News Ahemdnagar second death of corona 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here