Home अकोले अकोलेत प्रवरा नदीपात्रात बुडणाऱ्याला एका धाडसी तरुणाने वाचविले

अकोलेत प्रवरा नदीपात्रात बुडणाऱ्याला एका धाडसी तरुणाने वाचविले

अकोले: अकोले तालुक्यातील ढोकरी येथे प्रवरा नदीच्या पाण्यात यशवंत डोळस हे पोहत होते. पोहत असताना ते दोन ध्रायापर्यंत पोहोचले आणि ते अचानक गटांगळ्या घेऊ लागले. तेथे समोरच नदीच्या काठावर उभ्या असलेल्या अर्जुन पथवे या आदिवासी तरुणाच्या ने निदर्शनास आले. त्याने लगेच आपला जीव धोक्यात घालून थेट नदीत उडी मारली आणि बुडणाऱ्या यशवंतचे प्राण वाचविले.

शनिवारी दिनांक ११ दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. यशवंत डोळस हे व्यायाम होईल म्हणून नदीवर केवलवाडीच्या डोहातील धारेमध्ये पोहत होते. पुढे गेल्यानंतर अचानक ते गटांगळ्या घेऊ लागले. त्यावेळी तेथून बरयाच अंतरावर अर्जुन पथवे हा आदिवासी मुलगा उभा होता. त्याच्या हे लक्षात आले आणि त्याने कसलाही विचार न करता थेट पाण्यात उडी टाकली. या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात बुडणाऱ्या यशवंत चे प्राण वाचविले. त्याननंतर यशवंत डोळस यांना मोटारसायकलवरून ढोकरीला आणण्यात आले. आज माझा पुनर्जन्म झाला आहे. अर्जुनला कधीही विसरणार नाही त्याने त्याचा जीव धोक्यात घालून माझे प्राण वाचविले आहे. अशा शब्दात यशवंत डोळसने अर्जुन चे आभार मानले.   

Website Title:  Latest News young man rescued drowning in a riverboat 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here