Home अहमदनगर जिल्ह्यात मास्क न लावणे ७०० जणांवर कारवाई, साडे तीन लाखांचा दंड

जिल्ह्यात मास्क न लावणे ७०० जणांवर कारवाई, साडे तीन लाखांचा दंड

अहमदनगर: करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विविध प्रतिबंधात्मक आदेश जरी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाभर सुरु आहे. मास्क वापरणे व सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे याचाही आदेश नऊ दिवसांपूर्वी जारी करण्यात आला होता. मात्र या आदेशाचे उल्लंघन करणे जिल्ह्यातील ७०० हून अधिक जणांना महागात पडले आहे. मास्क न वापरल्याबद्दल व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तब्बल ३ लाख ६० हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संभंधित प्रशासकीय यंत्रनेमार्फत कारवाई केली जाईल असा स्पष्टपणे आदेश बजाविण्यात आला होता. मात्र या आदेशाचे गांभीर्य लक्षात न घेता काहींनी याकडे कानाडोळा केला. मात्र असे प्रकार करणाऱ्या निदर्शनास आलेल्या ७०० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई यंत्रनेमार्फत करण्यात येत आहे.

कालपर्यंत संगमनेरमध्ये ६१ व्यक्तींकडून १५३००, शेवगाव ३२ व्यक्तींकडून १३२००, शिर्डी ६२ व्यक्तींकडून ३१०००, पाथर्डी ४५ व्यक्तींकडून २२ हजार ५०० जामखेड १५ व्यक्तींकडून ७५०, पारनेर ४९ व्यक्तींकडून १४ हजार १००, देवळाली प्रवरा ७७ व्यक्तींकडून २८ हजार ३५०, राहता १६ व्यक्तींकडून ८ हजार, नेवासे दोन व्यक्तींकडून एक हजार, श्रीरामपूर ३६ व्यक्तींकडून ६ हजार १००, कर्जत १६० व्यक्ती ८१ हजार २००, कोपरगाव ७२ व्यक्ती ३५ हजार ४५०, राहुरी २८ व्यक्ती १० हजार २५०, श्रीगोंदा ५७ हजार २०० याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.  

Website Title: Latest News Ahmednagar Action against 700 people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here