Home अहमदनगर Latest News: अहमदनगर: मजुराचा सारीमुळे मृत्यू

Latest News: अहमदनगर: मजुराचा सारीमुळे मृत्यू

पारनेर: परजिल्हा हंगा येथील पारनेर तालुक्यात मजुरी करून पोट भरण्यासाठी आलेल्या २८ वर्षीय दिव्यांग युवकाचा गुरुवारी सारी आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यात करोना आणि सारीचा एकही रुग्ण नसल्याने घाबरून न जाण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लोळगे यांनी केले.

विदर्भातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी नगर जिल्ह्यात येत असतात. मागील महिन्यात वाशिम जिल्ह्यातील एक कुटुंब हंगा येथील शेतकऱ्याच्या शेतात रोजगारासाठी आले होते. संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील काम संपल्यानंतर ते कुटुंब तेथून दुसरीकडे गेले. या कुटुंबात एक दिव्यांग युवक होता. या युवकाला सर्दी,  खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याला उपचारासाठी ७ एप्रिलला पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याला त्रास वाढल्यानंतर ग्रामीण रग्णालयातून नगरला हलविण्यात आले होते. त्याची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्याला पुन्हा पारनेर तालुक्यात पाठवण्यात आले. सकस आहाराअभावी प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्याचा त्रास बळावला. त्या युवकाला दुसऱ्या दिवशी पुन्हा नगरला नेण्यात आले. त्याची पुन्हा करोना व सारीची टेस्ट घेण्यात आली. यावेळी त्याला सारीचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

Website Title: Latest News Sari disease one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here