Home अकोले अकोले : भंडारदरा धरण ५० टक्के भरले; पाऊसाची संततधार सुरूच

अकोले : भंडारदरा धरण ५० टक्के भरले; पाऊसाची संततधार सुरूच

भंडारदरा : भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून त्यात लक्षणीय वाढ होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५४७४ दलघफू झाला आहे. पाण्याची होणारी आवक लक्षात घेता आठ वाजेपर्यंतच भंडारदरा धरण ५० टक्के भरणार आहे..

आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून भंडारदरा धरण व पाणलोटात धुमाकूळ घातला असून धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवारीही भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, साम्रद तसेच कळसुबाईच्या पट्टट्यातही संततधार सुरूच आहे. डोंगरदऱ्यातून मोठमोठे ओढे-नाले तुडूंब भरले असून अनेक लहान-मोठे धबधबे अक्राळ-विक्राळ रुप घेऊन ओसंडून वाहत आहेत. मध्यतंरी भंडारदरा धरण तसेच पाणलोटात पावसाने विश्रांती घेतल्याने भंडारदरा धरण यावर्षी भरते की नाही, अशी शंका निर्माण होत असतानाच पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने भंडारदरा धरण १५ ऑगस्टपर्यंत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांची आवणीसाठी (भात लागवड) लगबग सुरू असल्याने शुक्रवारी शेंडीच्या आठवडे बाजारात शुकशुकाट जाणवत होता.

Website Title: Latest News Akole: Bhandara Dam Dam Filled With 50%; The Offspring Of The Rain Begins

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here