Home Uncategorized अकोले : भंडारदरा धरणात ६० टक्के पाणीसाठा: पर्यटकांनी भंडारदरा परिसरात गर्दी

अकोले : भंडारदरा धरणात ६० टक्के पाणीसाठा: पर्यटकांनी भंडारदरा परिसरात गर्दी

अकोले : मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. परिसरातील सर्व धबधबे सुरू झाल्याने शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटकांनी भंडारदरा परिसरात गर्दी केली होती. बस, कार, दुचाकींची संख्या वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

रविवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणात सहा हजार ५६५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा झाला होता. भंडारदरा परिसरात पावसाने गेल्या काही दिवसांत दडी मारली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने भंडादरा परिसरातील धबधबे आणि ओढ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बस, कार, दुचाकींची संख्या वाढल्याने वाहतूक विस्कळीत होत होती. पोलिस बेशिस्त वाहनचालक व पर्यटकांवर कारवाई करीत होते. अनेक पर्यटक धबधब्याखाली तर काही रस्त्यावर बसून दारू पिताना दिसत होते. त्यामुळे निसर्गप्रेमींना त्रास सहन करावा लागला. भंडारदरा ते घाटघर परिसरातील सर्व हॉटेल्स बुक असून पांजरे, मुतखेल, कोलतेंभे येथील धबधबे पाहण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद येथून आलेल्या पर्यटकांच्या बस रस्त्यावरच उभ्या केल्याने पुढे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

रतनवाडी येथे २३२ सर्वाधिक म्हणजे नऊ इंचपेक्षा अधिक तर पांजरे येथे १५८ म्हणजे सहा इंच इतका पाऊस झाला. हरिश्चंद्र गडाच्या पट्ट्यातील पर्वतरांगातही पावसाचा जोर कायम असून संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात मुळा नदीला पूर आला होता. भंडारदरा जलाशयात रविवारी सकाळी सहा वाजता सहा हजार ५६५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा होता. निळवंडे जलाशय २७ टक्के भरला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस टिकून आहे. निसर्ग बहरल्याने येत्या काही दिवसांत पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Website Title: Letest  News Akole: Bhandardara Dam: 60% water Storage: Tourists Crowd In Bhandardara Area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here