Home अकोले अकोले: पिचडांच्या गैरकारभारप्रकरणी गुन्हा दाखल करा

अकोले: पिचडांच्या गैरकारभारप्रकरणी गुन्हा दाखल करा

अकोले: माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची पत्नी कमल यांच्या आदिवासी जातीच्या खोट्या दाखल्याची चौकशी करून गैरकारभाराबाबत १५ ऑगस्ट पर्यंत गुन्हा दाखल करावा. फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास अकोल्यात १७ ऑगस्ट ला होणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देत भाजपचे जेष्ठ नेते अशोक भांगरे यांनी घरचा आहेर दिला आहे.

पिचड यांनी आदिवासी विकास विभागाला हाताशी धरून आपल्या बिगर आदिवासी पत्नीला खोटा दाखला देऊन खर्या आदिवासीची फसवणूक केली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून त्यांनी गैरमार्गातून घेतलेल्या विविध लाभांच्या योजनेची चौकशी करावी. आदिवासी शेतकर्यांना जमिनी व शासनाकडून मिळालेले पैसे परत देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी अकोल्यात भरपावसात निषेध व जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गली गली मे शोर है पिचड चोर है, आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासीच्या जमिनी लुटणाऱ्या पिचडाचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करत हा मोर्चा बाजारतळावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व अशोक भांगरे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य किरण लहामटे , सुनीता भांगरे, अमित भांगरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदारांना सुनिता भांगरे यांच्या हस्ते देण्यात आले.     

Website Title: Latest News File a criminal offense on Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here