Home अकोले आ.डॉ. लहामटे यांच्या विकासकामांच्या बैठकीला १७ पैकी फक्त ४ नगरसेवक हजर

आ.डॉ. लहामटे यांच्या विकासकामांच्या बैठकीला १७ पैकी फक्त ४ नगरसेवक हजर

अकोले: अकोले मतदार संघाचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी राज्यसरकारकडून विविध योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बैठक बोलावली होती. तर या बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप प्रशासनाकडून प्राप्त होऊनही बैठकीला अध्यक्ष, उपाध्यक्ष अनुपस्थित होते. यांसह १७ पैकी फक्त ४ नगरसेवक हजर होते. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले मधुकर पिचड आणि माजी आ. वैभव पिचड या पिता पुत्रांशी नाळ जोडलेल्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आ.लहामटे यांच्या बैठकीला अनुपस्थितीत राहण्याचे पसंत केले असावी अशी चर्चा अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अकोले मतदार संघाचा विकास व प्रलंबित कामकाजाच्या निधी संदर्भात आ. डॉ. किरण लहामटे यांनी बैठक बोलावली होती. तश्या प्रशासनाकडून सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात दारुण पराभव पत्कारावा लागल्याने या द्वेषाने भाजपाच्या ताब्यात असेलेल्या अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांसह भाजप नगरसेवकांनी गैरहजेरी लावली.

अकोले नगरपंचायतमध्ये १७ सदस्य आहेत. या नगरपंचायतीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुभद्रा नाईकवाडी, स्वाती शेणकर, निशिगंधा नाईकवाडी व शिवसेनेचे प्रमोद मंडलिक यांच्या व्यतिरिक्त कोणीही हजर राहिले नाही. बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप प्रशासनाकडून प्राप्त होऊनही त्यांनी पिचड पिता पुत्रामुळे बैठकीला गैरहजर राहणे पसंत केल्याने या लोकप्रतिनिधींना मतदारसंघाचा विकास महत्वाचा आहे की पिता पुत्राची मर्जी असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

Website Title: Latest News Akole counceler Absent 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here