Home महाराष्ट्र राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे: मुख्यमंत्र्यांनी दिल्या सुचना

राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे: मुख्यमंत्र्यांनी दिल्या सुचना

मुंबई: राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, त्याचबरोबर नवीन रस्त्यांच्या कामाला गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रालयात झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते असे सुमारे तीन लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांचा दर्जा वाढवा व ते दीर्घकाळ टिकावे यासाठी पारंपारिक पद्धतीऐवजी आधुनिक नवीन तंत्रज्ञाचा वापर रस्ते विकासात करण्यात यावा. सध्या नवीन तंत्रज्ञान वापरून १ हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रस्त्यांच्या कामासाठी जागतिक बँकेकडून कर्ज उपलब्ध होते का याबाबत प्रस्ताव सादर करावेत. शासकीय निवासी इमारतींच्या दुरुस्थीवर भर देण्यात यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Website Title: Latest Newsuddhav thackeray Roads in the state should be dirt free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here