Home महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातल काही कळत नाही: राणेंचा हल्लाबोल

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातल काही कळत नाही: राणेंचा हल्लाबोल

मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकास कामांना स्थगिती देऊन विकासाला खिळ लावण्याचा प्रयत्न केला आहे. हे सरकार जनतेचे सरकार नसून स्थगिती सरकार आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातल काही कळत नाही, हे सरकार काही महिन्यानाचेच पाहुण्यांचे सरकार आहे असा हल्लाबोल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर हल्ला चढविला आहे. हे तीनही पक्ष आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होणार आहे. १० दिवस झाले तरी मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. सहा मंत्र्यांना अजूनही खाती दिली नाही. राज्याचा हिताचा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.  मी तर म्हणतो हे सरकार स्थगिती सरकार आहे. हे तीन पक्षाच सरकार जास्त काळ टिकणार नाही हे पाहुणे सरकार आहे. यांना प्रशासनातल काही कळत नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

Website Title: Latest News Narayan Rane Chief Minister does not know anything about the administration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here