Home अकोले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा:  मनोहर लेंडे

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा:  मनोहर लेंडे

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणातून जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.  जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे अशा विविध घोषणांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना संबोधित केले.

या कार्यक्रमप्रसंगी उप प्राचार्य लहानू पर्बत, एस.एस. पाबळकर, बी.एन. ताजणे, अजित गुंजाळ, आर.आर. मढवई, एस.व्ही. भालेराव, अविज्ञा चासकर आदी तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रमेश शेंडगे, सूत्रसंचालन संतराम बारवकर, प्रास्ताविक प्रा. शरद तुपविहीरे यांनी केले. तर प्रा. विनोद तारू यांनी आभार मानले.

Website Title: Latest News SVM Rajur Ambedkar Mahaniravan day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here