Home अकोले ब्राम्हणवाडा येथील अवैध त्वरित बंद करा अन्यथा आमरण उपोषण

ब्राम्हणवाडा येथील अवैध त्वरित बंद करा अन्यथा आमरण उपोषण

अकोले: अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे अवैध धंद्यांना ऊत आला असून त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे.खुलेआम बेकायदा  दारू विक्री,मटका,जुगार आदी अवैध व्यवसाईकानी   ब्राम्हणवाडा परिसरात जोर धरला असून या संदर्भात वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे कार्यवाही करण्याची मागणी केली मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.या संपूर्ण प्रकाराला ग्रामस्थ पूर्ण वैतागले असून ग्रामसभेत अनेक वेळा दारू बंदी साठी ठराव होऊनही त्याची अमलबजावणी झाली नाही.त्वरीत ब्राम्हणवाडा परिसरातील अवैधरीत्या चालू आसलेल धंदे तातडीने बंद करावेत या मागणी साठी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ गायकर यांनी दि.२१ जानेवारी पासून उपोषणाचा इशारा एका निवेदना द्वारे दिला आहे.

        यासंदर्भात अकोल्याचे तहसीलदार श्री.मुकेश कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि ब्राम्हणवाडा व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून खुलेआम दारूविक्री ,मटका,जुगार,चालू आहे.त्या मुळे परिसरातील महिला व नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणवर त्रास सहन करावा लागत आहे.या अवैधव्यवसायामुळे तरुणपिढी देखील व्यसनाधीन होत असून गावातील महिला व अन्य नागरिकांनी सदर अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत व त्या पासून होणाऱ्या त्रासाबाबत संबंधितांना वारंवार अवगत केले आहे.मात्र ठोस कार्यवाही अध्यापपर्यंत न झाल्याने नागरिकांमध्ये  तीव्र असंतोष तयार झाला आहे.ब्राम्हणवाडा परिसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास आंदोलनाचा ईशारा ग्रामस्थांनी दिला असून संजय गायकर यांनी उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे  दिला आहे . या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक अकोले,तहसीलदार,ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा,आदींना दिल्या असून या उपोषणाला सबला महिला मंडळ ब्राम्हणवाडा,अशोक सब्बन सरचिटणीस भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन,अकोले तालुका महाराष्ट्र नव निर्माण सेना,शिवसेना आदींनी पाठींबा दिला आहे.

Website Title: Latest News Akole Invalid shut down immediately

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here