अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा. संजय राऊत यांचा जाहीर निषेध
अकोले: देशाचा मानबिंदू छत्रपती शिवरायांचा अवमान व त्यांच्या वंशजाचा अपमान हा महाराष्ट्रतील जनतेचा अपमान आहे हा अवमान करणाऱ्या शिवसेनेचा खासदार संजय राऊत याचा जाहीर निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
भाजपचे वतीने देण्यात आलेले निवेदन म्हटले आहे की, युगपुरुष छत्रपती शिवराय हा देशाचा मानबिंदू आहेत. ज्यांचे नावावर हे पक्ष चालवतात त्यांनी वंशजाकडे तुम्ही त्यांचेच वंशज आहे असे पुरावे मागण्याचा शहाजोगपणा केला आहे. तसेच शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केला आहे. शिवसेनेचे या नेत्याला सत्तेचा माज चढला आहे. महाराष्ट्र राज्यात शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवून युवक व जनतेला भुलविण्याचे काम शिवसेना करीत आहे. तसेच मराठा समाजाच्या मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामना चा संपादक हा राऊत असून त्याचा जाहीर निषेध केला आहे.
छत्रपती शिवराय हे देशाचा मानबिंदू असल्याने ते युगपुरुष आहेत त्यांचा अवमान देशाचा अवमान आहे त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, युवा सरचिटणीस सुनील उगले, उपाध्यक्ष वाल्मिक देशमुख, सुशांत वाकचौरे, राहुल चव्हाण, शारदाताई गायकर, बाबासाहेब उगले, कैलास तळेकर, दत्ता रत्नपारखी आदी केली आहे.
Website Title: Latest News BJP Public protests by Sanjay Raut